spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

युवा अधिवेशनातून Ajit Pawar यांच्याकरवी कार्यकर्त्यांची कानउघाडणी…

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. या निवडणूका म्हटल्यावर दौरे, बैठका, आंदोलने, इ. सारख्या अनेक गोष्टी या आल्याचं. त्यासोबत अनेक नेत्यांचे, पक्ष सादस्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे तर झालेच. ज्याचे पारडे जड तिथे अनेक पक्ष सदस्य, नेते यांचे स्थलांतरण होतच असते. या संपूर्ण गतिविधींवर बड्या किंवा वरिष्ठ नेत्यांचे लक्ष हे असतेच. त्याचवेळी आता अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची कां उघाडणी केली आहे. आपण डोळ्यात तेल घालून काम करायला हवं. कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे (sunil tatkare) आणि माझ्याशी बोला आणि मगच बोला अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या, हलगर्जी पणा करु नका. लोकसभेचं नरेटीव आपल्याला बदलायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले. ते युवा अधिवेशनात बोलत होते. जाणूयात ते नेमके काय म्हणाले.

अजित पवार नक्की काय म्हणाले ?

“आपण डोळ्यात तेल घालून काम करायला हवे कोणतेही वक्तव्य करत असताना सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मग बोला… ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या हलगर्जी पणा करू नका. लोकसभेचं नॅरेटिव्ह आपल्याला बदलायचं आहे. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही. आपल्याला महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत यावर तुमचे माझे आणि पक्षाच भवितव्य अवलंबून आहे. शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला काम पोहचवायचं आहे. अजिंक्य घड्याळ संवाद हा कार्यक्रम आपल्याला विधानसभा मतदार संघात घ्यायचा आहे. काही झाले तरी नकारात्मक प्रचार होता कामा नये, फक्त विकास कामावर बोलणे आणि योजना सुरु ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणि जास्तीच जास्त आमदार निवडून आणायचे आहेत. विरोधक सांगतील सामाजिक विभागाचे पैसे काढले, आदिवासीचे पैसे काढले पण असे काही नाही. बेरोजगारी कमी करण्याचे काम आपण करत आहोत जिथे जागा आहेत तिथे आपण भरती करत आहेत. आपण चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस जिल्हा पातळीवर देणार आहोत तसेच पुढे त्याला चांगल्या पदावर घेऊ. जो पक्षाचं काम करेल त्याला मान सन्मान मिळेल. आपला सोशल मीडियावर प्रचार कमी आहे. त्यामुळं अजिंक्य घड्याळ हा पाहिला कार्यक्रम आहे. रोज एक लाख व्हू पार पाडणाऱ्याला बक्षीस आणि सन्मान मिळेल. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचार वाढवण्याचे आवाहन  अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. रक्षाबंधन भावा बहिणीचा सण आहे. आत्तापर्यंत जितके रक्षाबंधन झाले त्यामधे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त राख्या विकल्या गेल्या आहेत. बहिणीच प्रेम वाढलं आहे. आपुलकी जिव्हाळा अनुभवला मिळतं आहे. आत्ता पर्यंत आपल्या लाडक्या बहीण योजनेबाबत आपल्याकडे टिंगल टवाळी करण्याच्या प्रयत्न केला. बहिणींनो तुम्ही काळजी करु नका आपण सगळी अर्थिक व्यवस्था केली आहे.”

हे ही वाचा:

“वाढवण बंदर आर्थिक व्यापाराचे केंद्र बनणार” – PM Narendra Modi

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss