spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना भाजपाने ऑफर दिल्याचं मोठं विधान केलं. तसेच ऑफर असली तरी भाजपा अजित पवारांचं काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना भाजपाने ऑफर दिल्याचं मोठं विधान केलं. तसेच ऑफर असली तरी भाजपा अजित पवारांचं काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी या संबधी सांगितले आहे. पत्रकारांनी अजित पवारांना राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबतही विचारणा केल्यावर ते म्हणाले, “हे राज ठाकरे बोलले आहेत, मी सांगितलेलं नाही. राज ठाकरेंना भाजपाने ऑफर दिली असेल, पण त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, मी त्यावर बोलणार नाही. भाजपाने ज्याला ऑफर दिली तो त्यांचा आणि भाजपाचा विषय आहे. मी कशाला त्यात नाक खुपसू. असेदेखील अजित पवार म्हणाले आहेत.

तब्बल दीड वर्षांनी तुरुंगाबाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याशी चर्चा झाली का या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “माझी आणि नवाब मलिकांची भेट झालेली नाही. मी कालच कोल्हापूरला आलो आहे. फोनवर अशी चर्चा होऊ शकत नाही. अटक झालेल्या व्यक्तिशी अशाप्रकारे फोनवर बोलता येत नाही. त्यांना सध्या वैद्यकीय कारणाने तुरुंगातून बाहेर सोडलं आहे. त्यातून ते बाहेर आल्यावर त्यांना भेटता येईल. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता , असलं काही तरी विचारू नका. माझ्याशी संबंधित प्रश्न किंवा राज्य सरकारशी संबंधित असणारे प्रश्न जरूर विचारा,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बैठक आज (१४ ऑगस्ट) पार पडली. या बैठकीला पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राज ठाकरे यांनी आपल्याला भाजपाची ऑफर आहे. परंतु, मी अद्याप कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नाही, अशी माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा:

नारायण राणे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

दिल्ली समोर महाराष्ट्रा कधीही झुकणार नाही, सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss