Ajit pawar Live: पूरग्रस्तांची चिंता सरकारला नाही ; अजित पवार

Ajit pawar Live: पूरग्रस्तांची चिंता सरकारला नाही ; अजित पवार

Ajit pawar :  महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्याला  विरोधकांकडून राज्य सरकारवर सतत टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या मराठवाड्यासह विदर्भात पूरग्रस्त भागात पाहणी दौरा करत आहेत. या पाहणी दौऱ्यात अजित पवार यांनी वारंवार प्रशासनावर निशाणा साधलेला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रातील काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील या भागात पाहणी दौरा केला आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असे आश्वासन केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्त यांची चिंता नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. राज्य सरकारचा गतीने कारभार झाला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत असे आवाहन याप्रसंगी पवार यांनी राज्य सरकारला केले.

पुढे अजित पवार म्हणाले, “अतिवृष्टीच्या काळात शंभरहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार जीवित हानी झालेल्या कुटुंबांना चार लाखाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, परंतु आत्ताच्या काळात ही रक्कम शुल्लक आहे. शेतकऱ्यांसह पशुसंवर्धन करणाऱ्यांचे देखील यात नुकसान झालेले आहे याबाबत प्रशासनाने दखल घेत निर्णय घ्यावेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’चं उद्घाटन रद्द, स्वयंसेवी संस्थांचा हस्तक्षेप

Exit mobile version