मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे ; अजित पवार

मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे ; अजित पवार

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर भागातील समुद्रात दोन अज्ञात व संशयास्पद बोट आढळून आल्या. त्यानंतर आता राज्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होणार असलायची, धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अलर्ट मोडवर जारी करण्यात आला आहे. मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ला अजूनही कोणी विसरलेल नाही. त्याच्या जखमा अद्यापही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र आता, मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे. सणासुदीच्या काळातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा हल्ला होणार असल्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

या पाश्वभूमीवर राज्यचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धमक्या येत असतात, काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी याच्या कुटुंबीयांना धमक्फोयांचे फोनेआले होते. पण काही असे माथेफिरू असतात. पण मुंबईला आलेली ही धमकी यासंर्भात प्रशासनाने दाखल घ्यावी. असे अजित पवार यांनी म्हटले.

ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा : 

भारतीय अक्षय ऊर्जा दिवस २०२२: राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिनाचा इतिहास आणि महत्त्व

Exit mobile version