spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ajit Pawar म्हणाले, पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि शिंदे गट - भाजप यांच्या सोबत सरकार स्थापन केले.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि शिंदे गट – भाजप यांच्या सोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडी नंतर राज्यात अनेक राजकीय छोटे मोठे भूकंप हे होतच आहेत. नुकतंच राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे संपले आहे. तर आता नुकतचं अजित पवार यांनी एक मोठं विधान केले आहे त्यामुळे चर्चाना उधाण हे आले आहे. आज दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरुन होत असलेल्या चर्चांना उत्तर दिलं. शिवाय आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीच फसवणार नाही, असाही शब्द त्यांनी दिला.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत की, आता आपण पुढे गेलो आहोत, कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण भूमिका घेतली आहे, त्यामध्ये आता बदल होणार नाही, असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही एकच आहोत. कशाला वाईटपणा घ्यायचा असं वाटत असेल तुम्हाला, पण आता आपण पुढे आलो आहोत. कुठेही कसलीही मॅचफिक्सिंग नाही. आता आपल्याला कोणालाही फसवायचं नाहीये. जी भूमिका घेतलीये, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं अजित पवारांनी म्हटलं.

 

तसेच पुढे आगामी निवडणुकांसंदर्भात बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत की, मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या. कारण लोकसभेनंतर चार महिन्यातच विधानसभा लागणार आहेत, अशा सूचना देखील अजित पवारांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आता लोकसभा महत्वाची आहे. पण निवडणुकांनंतर विधानसभेचीही तयारी करायला हवी. आपण लोकसभेच्या सर्वाधिक सहा- नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, अशा सूचना देखील अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss