चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवारांची जोरदार टीका

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवारांची जोरदार टीका

काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते एका मागे एक वादग्रस्त वक्तव्य करत आहे. आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सुद्धा वादग्रस्त वक्तव्याच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्र सोडलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. वाह रे पठ्ठ्या… आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली, असं म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो. त्या काळात भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, हा भाऊराव पाटील यांचा विचार होता.

उपस्थित नागरिकांना उद्देशून बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, “ही जी भाषा वापरली जातेय, ही बदलण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला घरी पाठवायचं आणि कुणाला शेती बघायला लावायची, हे तुमच्या हातात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाच्या अधिकाराअंतर्गत हा अधिकार तुम्हाला दिला आहे.” असंही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : नेमका कसा आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग ?

ईशान किशनने तोडला एक दिवसीय क्रिकेटचा सर्वात मोठा विक्रम

Sulochana Chavan रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा गायन प्रवास

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version