अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

अजित पवारांनी आज माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ठाण्यात १०० जणांना गरज असताना संरक्षण देण्यात आले नाही.

अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

अजित पवारांनी आज माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ठाण्यात १०० जणांना गरज असताना संरक्षण देण्यात आले नाही. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना ठाण्यामध्ये त्याच बरोबर राज्यामध्ये संरक्षण देण्याची गरज आहे. काही नावे तर अशी आहेत त्यांचे व्यवसाय वगैरे आहेत त्यांना सरकारी खर्चातून संरक्षण देण्याची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु अजून पर्यत साकारून कोणतेही उत्तर आलेले नाही. ठाण्यामध्ये ज्यांना संरक्षण दिले आहे त्याची यादी माझ्या हातामध्ये आहे. यामधील काहींना संरक्षण देण्याची गरज नाही. १०० लोकांना संरक्षण दिले आहे त्यामधील काही लोकांना संरक्षण देण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, आतापर्यत १०० लोकांना संरक्षण देण्यात आले आहे त्याचा खर्च शासनावर पडत आहे. १०० जणांमध्ये एक पोलिस निरीक्षक शेखर बागडे याचाही समावेश आहे. त्याची एवढी मोठी संपत्ती आहे, त्याबाबत तक्रार आली आहे. मी पण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. सरकार पैश्याच्या जोरावर यांचा मोठेपणा का वाढवत आहेत? सरकारने ठाणे जिल्ह्यातील किती लोकांना संरक्षण दिले यादी लवकरात लवकर जाहीर करावी. असे अजित पवार म्हणाले. एवढेच नाही तर अजित पवारांनी शेखर बागडे यांच्या संपत्तीच्या बाबतीत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुढे अजित पवार म्हणाले की, आम्ही पण १५ वर्ष काम करत होतो. भांड्याला भांडे लागतात. जाहिरात दिल्यावर २४ तासाच्या आत दुसरी जाहिरात द्यावी लागली. शिवसेना शिंदे गटाला बॅकफूटवर जावे लागेल. काल कशी जाहिरात कशी देण्यात आली होती. आज पुन्हा जाहिरात देण्यात यावी त्यामधील मजकूर पहिला आहे. ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदावर आहोत, त्यांनी याचे बारकावे लक्षात घेऊन तणाव निर्माण होणार नाही. ठाण्यात राहून मग्रूरपणा करत असेल तर कोणाचा वरदहस्त असेल, हा कसा काय बेफाम वागतो, असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version