Ajit Pawar यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Ajit Pawar यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तर अनेक घडामोडी या होत असल्याचं दिसत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले आहेत की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक पार पाडीन.”

ष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी दिनांक २ जुलै मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही महाराष्ट्राच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात उपस्थित होते.

राजाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते समर्थक आमदारांसह ते राजभवनात आहेत. त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मंत्रीही राजभवनात पोहोचले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडली आहे, हे जवळपास स्पष्ट झालं आहे

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत राजभवनात गेलेले काही आमदार शरद पवार यांच्या पाटण्यातील विरोधी एकता बैठकीत राहुल गांधींसोबत व्यासपीठ सामायिक करण्याच्या आणि त्यांना सहकार्य करण्याच्या “एकतर्फी” निर्णयावर नाराज होते.

Exit mobile version