चूकभूल करू नका… बापासोबतच राहा, Ajit Pawar यांचा इशारा कोणाला?

चूकभूल करू नका… बापासोबतच राहा, Ajit Pawar यांचा इशारा कोणाला?

आगामी विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेवपाळी असून आता निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संपर्कात असलेल्या मुलीवर मोठे भाष्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी “जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमची काय होईल? असा सवाल त्यांनी नाव घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारला आहे. “पक्षफोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील मोठे भाष्य केले असून “चूकभूल करू नका… बापासोबतच राहा,” असा सल्ला धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्येला दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यावेळी या प्रकरणावर भाष्य करत म्हणाले, “विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरु आहे. मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचं आहे कि, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूकभूल करू नका. बापासोबत राहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहात. हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. त्यासंदर्भात आम्हीदेखील अनुभव घेतला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली. मात्र आता माझे सांगणे आहे कि, वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम?

धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री हलगेकर हि शरद पवार गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्यामुळे आगामी निवडणुकीत वडिलांविरुद्ध मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चाना सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. पण जी मुलगी बापाची झाली नाही, ती तुमच्या पक्षाची कशी होणार? माझ्याकडे दुधारी तलवार आहे. माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. आत्राम घराणं हलगेकर कुटुंबाला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

आत्राम पुढे म्हणाले, “जे माझ्या खुर्चीवर बसण्याचं पाहतील त्यांना बाजूला करण्याचं काम मी करणार आहे. मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अश्या सर्व लोकांना समान न्याय दिला आहे. मी सतत काम करत आलो आहे. हे मधेच येऊन अश्या प्रकाराची काम करत असतील तर त्यांची वाट लावायचं काम आपल्याला करायचं आहे. मी इमाने इतबारे काम केलं. ५० वर्षे या भूमीचे रक्षण करण्याचं काम केलं. शेवटच्या श्वासापार्यंत मी काम करणार. एक गेली तरी कुटुंबाची संपूर्ण फौज माझ्यामागे उभी आहे. पक्षफोडी करणारा पक्ष आज माझे घर फोडत आहे,” असे ते यावेळी म्हणाले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून आता यावर शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version