पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले

आज २७ जून रोजी एका तरुणाने एकतर्फी प्रेंमातून तरुणीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरामधील सदाशीव पेठेत हा प्रकार घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले

आज २७ जून रोजी एका तरुणाने एकतर्फी प्रेंमातून तरुणीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरामधील सदाशीव पेठेत हा प्रकार घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. याचदरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी घटनेचा संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सरकारवर ताशेरे देखील ओढले आहेत. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अजित पवारांनी पुण्यामध्ये झालेल्या घटनेनंतर ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये अजित पवार म्हणाले की, “विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.” असे अजित पवारांनी ट्विट केले आहे.

सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ आज सकाळी प्रेम संबंधास नकार देणाऱ्या तरुणीवर हा हल्ला करण्यात आला. या कोयत्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यात युवती जखमी झाली आहे आणि आता तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या युवकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शंतनू लक्ष्मण जाधव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version