Thursday, July 4, 2024

Latest Posts

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार विरोधी बाकांवर असतील – महेश तपासे

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Nationalist Congress Party Chief Spokesman Sharad Chandra Pawar Mahesh Tapase) यांनी आज अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Nationalist Congress Party Chief Spokesman Sharad Chandra Pawar Mahesh Tapase) यांनी आज अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आणि याला केवळ सरकारचे अपयश झाकणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले.

महेश तपासे यांनी विद्यमान सरकारवर गंभीर आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आरोप केला, परिणामी राज्याचे कर्ज ₹ ७ लाख कोटींहून अधिक झाले. “अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी तयार केलेला एक गोड दस्तावेज आहे.महाराष्ट्रासमोरील गंभीर आर्थिक प्रश्न,वाढती बेरोजगारी, घटते औद्योगीकरण, शेतकरी आत्महत्या असे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले अशी टीका तपासे यांनी केली. प्रचंड कर्जाचा बोजा पाहता अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत तपासे यांनी टीकात्मक प्रश्न उपस्थित केले. “सध्याच्या सरकारच्या आर्थिक बेजबाबदारपणामुळे राज्य मोठ्या प्रमाणावर कर्जाखाली दबले जात असताना, या योजना आणि उपक्रमांसाठी निधी कोठून आणणार असा प्रश्न उपस्थित करत अर्थसंकल्पात कर्ज कपात आणि वित्तीय स्थिरतेसाठी वास्तववादी योजना नाही,” याचे निरीक्षण तपासे यांनी नोंदवले.

शिंदे सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रात औद्योगिक व व्यावसायिक प्रकल्प कसे आकर्षित करणार आणि बेरोजगारी कशी कमी करणार हे स्पष्ट करण्यात वित्तमंत्री अपयशी ठरले. “वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर, अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक केंद्रांमध्ये व्यावसायिक गुंतवणूक खेचण्यासाठी कोणतेही ठोस धोरण दिलेले नाही. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न सहाव्या क्रमांकावर घसरले आहे याचीही आठवण तपासे यांनी करून दिली. लोकसभेच्या पराभवानंतर सरकारला जनतेची आठवण आली व अशा प्रकारच्या पोकळ घोषणांचा पाऊस त्यांनी आज पाडला तरीही महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल, आणि अजित पवार विरोधी बाकावर बसलेले दिसतील,” असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss