spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवार आज नागपुरातून तातडीने सरकारी विमानाने मुंबईकडे होणार रवाना

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) हे तातडीने नागपुरातून (Nagpur) मुंबईला (Mumbai) येणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) हे तातडीने नागपुरातून (Nagpur) मुंबईला (Mumbai) येणार असल्याची माहिती मिळत आहे. पण शिंदे फडणवीस सरकारने अजित पवार यांच्या तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन दिल्याची माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात (Nagpur winter session) आहेत.

दरम्यान अजित पवार तातडीने मुंबईत येण्याच मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु केवळ तातडीचं कामाची माहिती शिंदे सरकारला देण्यात आली. त्यानुसार सरकारकडून अजिक पवार यांना विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. अजित पवार दुपारी १ वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्याला अशाप्रकारच्या सोयी उपलब्ध असतात परंतु त्यासाठी त्यांना कारण नमूद करावं लागतं. त्या कारणाची पडताळणी केल्यानंतरच विमानाची परवानगी देण्यात येते. आजच्या दिवसातील आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे अजित पवार त्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल (Arthur Road Jail) ते सिद्धिविनायक मंदिर ( Siddhivinayak Temple) दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

CBSE बोर्डाकडून दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात गाईडलाईन्स जारी

Maharashtra Assembly Winter Session 2022 अधिवेशनाचा आज ८ वा दिवस, विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज होणार सुटका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss