सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार म्हणाले उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे पण मुळात हे सरकार लोकशाहीच्या तत्त्वांना पायदळी तुडवून अस्तित्वात अस्तित्वात आलेले हे सरकार आहे त्यामुळे शिंदे सरकार विधी मान्य सरकार आहे आम्ही अधिवेशनाआधीच्या चाय पानाला स्वीकारले नसून त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहोत. सत्ताधारांकडून राज्यातील प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि याबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही.” असे अजित पवार यांनी म्हटले.

पुढे अजित पवार यांनी म्हटले, “हे सरकार येऊन काहीच दिवस झाले आहेत तरीसुद्धा यांच्यातील काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटवायची भाषा करत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा त्यांचे हात तोडा आणि जर हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा अरे ला कारे म्हणा, कोथळा काढा अशी भाषा शिंदे गटांच्या आमदारांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या सुसंस्कृतपणा शिकवला काम करण्याची पद्धत दाखवली एक अर्थी त्यांनी आपल्यावर संस्कार केले आहेत.परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पटतंय का त्यांच्या आमदारांचे हे वागणं?”,असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

‘वंदे मातरम’ म्हणण्याच्या मुद्द्यावरूनही अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया :

महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर हॅलो ऐवजी आता वंदे मातरम बोलावे असे एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, “महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कोणी कोणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कोणी जय हरी म्हणतो,आता मध्येच काय वंदे मातरम काढलं आमचा वंदे मातरम बोलण्यावर विरोध नाही पण हा विषय सध्या महत्त्वाचा आहे का? महागाईवर बोला जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला जात आहे त्याविषयी बोला त्याचं तुम्ही काय करणार आहात?”, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा : 

एकनाथ शिंदेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र

Exit mobile version