Saturday, June 29, 2024

Latest Posts

अजित पवार यांचा विरोधकांवर हल्लबोल, याबाबत बोलण्याची गरज…

राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन उद्यापासून पार पडत आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात (Assembly session) राज्य सरकारच्यावतीने अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे.

राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन उद्यापासून पार पडत आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात (Assembly session) राज्य सरकारच्यावतीने अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं. राज्यात शतेकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असूनही सरकार गंभीर नाही. त्यामुळे, अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर आपण बहिष्कार घालत असल्याचे विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यानंतर, सत्ताधारी पक्षाने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र चहापान कार्यक्रमानंतर येत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. तर दुसरीकडे विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत आपल्या बहिष्काराचं कारण सांगितलं होते. तर यावेळी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी सुरुवातीला भूमिका मांडली. अजित पवार यांनी विरोधकांनी पत्रात मांडलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विरोधकांनी मांडलेल्या पहिल्या मुद्द्यावर अजित पवारांनी शल्य व्यक्त केलं.

यावेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत की, “मनुस्मृती सारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान असणार नाही. इतरही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत त्याबाबत सभागृहात चर्चा होईल. सभागृहात मुख्यमंत्र्‍यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून कुठलंही अधिवेशन गुंडाळण्यात आलेलं नाही. सभागृह व्यवस्थित सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं. प्रत्येक बिलावर, लक्षवेधीवर आणि आयुधावर चर्चा होते आणि प्रत्येक प्रश्नावर समाधानकारक उत्तर दिलं जातं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडे आहे. त्यांनी काय बोलायचं हा त्यांना लोकशाहीत अधिकार आहे. पण प्रत्येकाच्या प्रश्नाला राज्य सरकारकडे उत्तर आहे. याबाबत तीळमात्र शंका नाही”, असं अजित पवार म्हणाले. “विरोधकांकडून जाणीवपूर्वक वेगळं नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक या माध्यमातून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही आणि महाराष्ट्राला परवडणारं देखील नाही. मनुस्मृतीचं महाराष्ट्र सरकारने समर्थन केलेलं नाही. याउलट आमच्या सर्वांचा त्याला विरोध आहे”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

“प्रत्येक अधिवेशनाला मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे सर्वांना चहापानाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देत असतात. त्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण अलिकडे बघतोय की, काही वर्षांपासून विरोधक चहापानाला येत नाहीत. ते एक पत्र देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे टाकत असतात. त्यांनी आज एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतील श्लोकाच्या मुद्द्यावर केली. खरंतर त्याची काही गरज नव्हती. त्याबद्दल स्वत: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे. ते इथेदेखील बसले आहेत. कुठल्याही प्रकारचा तशाप्रकारचा श्लोक पुस्तकात नाही. त्यामुळे याबाबत विरोधकांनी बोलण्याची गरज नव्हती”, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss