spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोर्च्याच्या परवानगी संधर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया

शनिवारी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चेच आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात महापुरुषांच्या अपमानावरून राजकीय पारा चढला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीकडून राज्यात महामोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद (Press conference) घेऊन याची माहिती देण्यात आली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) महामोर्चाला परवानगी नाकारल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने होईल. लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने आपलं मतप्रदर्शन करण्यासाठी मोर्चा काढला जातो तसाच आम्ही मोर्चा काढणार आहोत. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे ज्या सर्व परवानग्या मागायच्या असतात त्या मागितल्या आहेत. अद्याप परवानगी आमच्या हातात आलेली नाही, परंतु नक्की येईल. आम्हाला परवानगी मिळेल याविषयी विश्वास आहे. “आम्हाला कोणतीही परवानगी नाकारली गेली नाही. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमचा मोर्चा निघणार आहे. त्यानुसार मुंबईत एमएमआरडीएच्या भागातून आणि ठाणे, पालघर, नाशिक, पुणे अशा सर्व महाराष्ट्रातून उत्सफुर्तपणे लोक त्यात सहभागी होतील,” असं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार पुढे म्हणाले, “आमचं महाराष्ट्रातील तमाम जनेतला आवाहन आहे की, ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचं आहे त्यांनी सहभागी व्हावं. मोर्चाचे विषय कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. सीमाप्रश्न उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि महापुरुषांविषयी जे वक्तव्ये केली जात आहेत हाही सगळ्यांचाच प्रश्न आहे. हा एकट्या कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रश्न नाही. बेरोजगारी आणि महागाई हाही सर्वांचाच प्रश्न आहे.”

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

पुण्यात नदीच्या पात्रात पंप सोडताना विजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss