‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला आह . यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ७२ तासात दोन खोटो गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचं सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषण केली. यानंतर राष्ट्रवादी नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केले. जितेंद्र आव्हाड यांनी ७२ तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून राजीनामा देतो असे म्हटले. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

Raj Thackeray : राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर

पुढे अजित पवार म्हणाले, जेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये मुख्यमंत्री बसलेले होते. त्यांच्यासमोर ही घटना घडली असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी. कसे का होईना, पण तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. या प्रकरणी स्पष्टता द्यावी, कायदा हातात घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल तर ते दुर्दैव आहे. हा गुन्हा तातडीने मागे घेतला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

‘राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे’ असेही त्यांनी म्हटले.

Jitendra Awhad : “…त्याला विनयभंग म्हणता येत नाही”; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Exit mobile version