spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

काल (११ सप्टेंबर) रोजी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारसह अनेक बडे नेते अधिवेशनाला उपस्थित होते. याप्रसंगी अजित पवार यांना बोलण्याची संधी फार उशिराने दिल्या नंतर ते तिथून निघून गेले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. परंतु याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले.

अजित पवार म्हणाले,”पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. यात मी काल बोलणं टाळलं. याचा माध्यमांनी काल चुकीचा अर्थ काढला. मी एकटाच नाही तर सुनील तटकरे, वंदना चव्हाण, वेळेअभावी बोलू शकले नाहीत. मी मराठी माध्यमांना काल नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली. मी वॉशरूमला सुद्धा जायचं नाही का? असा सवाल त्यांनी केला. मी केंद्रात मार्गदर्शन करत नाही राज्यांत मी बोलत असतो. त्यामुळे गैरसमज दूर करावा, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : 

उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी

त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पाऊस चालू आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर राज्यभरात प्राण्यामध्ये वेगाने पसरत असलेल्या लम्पी या आजारावर राज्य शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात पवार यांनी अधिक माहिती आपल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे.

कोकणसह महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील ५ सर्तकतेचे

राज्यात लम्पी आजारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून त्यामुळे दुध व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दूधही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा प्राण्यांना विमा संरक्षण देण्यासाठीही उपाययोजना सरकारने कराव्यात. यासंदर्भात अजित पवार यांनी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे.” असंही सांगितलं आहे.

MPSC विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबवणार

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना बोलवण्यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला असून ही खूप गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर “आजपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री नेमले गेले नाहीत, ही खूप गंभीर बाब आहे. जर पालकमंत्री नेमले गेले नाही तर पैसे कसे खर्च करणार?” असा सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला.

Latest Posts

Don't Miss