Akshay Shinde Encounter: CM Eknath Shinde, Devendra Fadnavis स्वतःला सिंघम समजतात, पण त्यांनी पुरावा नष्ट करण्याचे काम केलं: Sanjay Raut

Akshay Shinde Encounter: CM Eknath Shinde, Devendra Fadnavis  स्वतःला सिंघम समजतात, पण त्यांनी पुरावा नष्ट करण्याचे काम केलं: Sanjay Raut

Akshay Shinde Encountar: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना सोमवारी (२३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याचे श्रेय दिले आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे श्रेय दिले आहे. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर समाज माध्यमांवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांच्या वर्दीतील बनवलेले बॅनर्स राज्यात ठिकठिकाणी लावले गेले होते. समाजमाध्यमांवरदेखील देवेंद्र फडणवीस ट्रेंडिंगचा विषय ठरला होता. फडणवीसांवर पॉलिसी वर्दीतील एडिट केले वेगवेगळे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत होते. एकप्रकारे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे श्रेय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो एडिट करून अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावरून आता संजय राऊत यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वतःला सिंघम समजतात, पण त्यांनी पुरावा नष्ट करण्याचे काम केलं आहे,’ अशी टिका त्यांनी केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत मोठे भाष्य केले. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे स्वतःला सिंघम समजतात. आता ‘मी सिंघम आहे’ यावरून दोन नेत्यांमध्ये चढाव आणि संघर्ष सुरू झाल्याचे महाराष्ट्रातल चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांचा बंदूक दाखवून फोटो आहे मी सिंघम… एकनाथ शिंदे यांच्या हातातदेखील बंदूक आहे. ते देखील बोलत आहेत मी सिंघम… या महाराष्ट्रात अडीच वर्षात असंख्य बलात्कार आणि महिलांवर अत्याचार झाले. एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात ठाणे जिल्ह्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातदेखील अश्या गुन्ह्यांचे असंख्य मी आकडे देऊ शकतो

ते पुढे म्हणाले, “कालच नालासोपारा मध्ये भारतीय जनता पक्षातील एका पदाधिकाऱ्याला सामुदायिक बलात्कारात अटक करण्यात आले. देवेंद्र फडणवीस तुमच्या हातात बंदूक आहे ना पोस्टरवर… सिंघम स्वतः जाऊन गोळ्या घालतो. समान कायद्याचा विचार केला तर प्रत्येकाला एकच न्याय पाहिजे. बदलापूर मध्ये तुम्हाला कोणाला तरी वाचवायचे आहे. संस्थेतले दोन-तीन लोक असे आहेत त्यांच्यावर हायकोर्टात आरोप झाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेतला. पुरावा नष्ट केला. पुरावा नष्ट करण्याचे काम तुम्ही केलं… या बलात्कार कांडातील सूत्रधारावर त्या शाळेतील मुलींचा वापर करून पॉर्न फिल्म, चाईल्ड ट्रॅफिकिंग अश्या घटना घडत होत्या असे आरोप याचिकेत समोर आलेले आहे. त्या शाळेतील एक व्यक्ती आरएसएस संबंधित होता. आधी तुमच्यात ठरवा सिंघम कोण? मिस्टर शिंदे सिंघम आहेत का फडणवीस सिंघम आहेत? त्या दोघांनी बसावं आणि कॅबिनेट भरवावी आणि त्यांनी ठरवावं आमच्यातला सिंघम कोण?” अशी खोचक टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – शरद पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version