spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Shinde Encounter: अग्रलेख तूच लिहिला होतास ना रे, आपले पाय कुठल्या शेणात…Naresh Mhaske यांचे राऊतांवर ताशेरे

बदलापूर (Badlpaur) येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवार २३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अक्षय शिंदेला कळवा येथील शासकीय रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. पण जर अक्षय शिंदे याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे एक ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राला सत्य कळायला हवे, अशी मागणी केली असून त्यावरून आता खासदार नरेश म्हस्के यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.

काय म्हणाले खासदार नरेश म्हस्के? 

अरे संजय राऊत, अरे किती खोटं बोलणार? लोकांना किती फसवणार?? आपले पाय कुठल्या शेणात आहेत ते तरी बघा …चार-पाच वर्षांच्या चिमूरड्यांवर बलात्कार करणारा अक्षय शिंदे मारला गेला तर तुम्हाला पोटशूळ उठतो, त्याला आजच्या आज फाशी द्या अशी मागणी करणारे तुम्हीच ना..कल्याण कोर्टात नेतानाचा, महिन्याभरापूर्वीचा त्याचा व्हिडिओ दाखवून तुम्ही विचारताय की बुरखा घातलेला माणूस गोळीबार कसा करेल म्हणून? दूधखुळे आहात की काय? तुम्ही असाल, पण जनता मात्र नाही. कल्याण कोर्टात नेत असतानाचा हा जुना व्हिडिओ आहे हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. तुमच्या भूलथापा आणि तुमचे कांगावे आता जनतेच्या लक्षात आले आहेत. तुम्ही केलेल्या ट्विटवर लोकांनी काय कमेंट केल्या आहेत त्या जरा बघा एकदा …

एन्काऊंटर केलं तेव्हा…

आता एवढे गळे काढता, शंभर कोटींच्या वसुलीसाठी मनसुखहिरेन चा एन्काऊंटर झाला तेव्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कोण होते? Disha Salian, सुशांत शर्मा, पत्राचाळ असं बरंच काय काय आपल्या मागे आहे. त्यामुळे उगाच आपली नसलेली बुद्धिमत्ता दाखवू नका. लोक तुमच्यापेक्षा खूप हुशार आहेत. तेलंगणा पोलिसांनी एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात चार आरोपींचा एन्काऊंटर केलं तेव्हा 2019 मध्ये न्याय झाला असा अग्रलेख तूच लिहिला होतास ना रे… मग महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का? एक गोष्ट लक्षात ठेव, धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः। तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।

हे ही वाचा:

सुप्रिम कोर्टाचा निर्णय देशाच्या बेसिक स्ट्रक्चरविरोधात; आरक्षणावरून Prakash Ambedkar यांचे मोठे वक्तव्य

कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss