Akshay Shinde Encounter: विरोधकांना आरोपीच्या मृत्यूचे दुःख, विरोधक जे आरोप करतायत ते हास्यास्पद: Shrikant Shinde

Akshay Shinde Encounter: विरोधकांना आरोपीच्या मृत्यूचे दुःख, विरोधक जे आरोप करतायत ते हास्यास्पद: Shrikant Shinde

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावर आता शिवसेना नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत विरोध्दकानावर टीका केली आहे. ‘विरोधकांना आरोपीच्या मृत्यूचे दुःख झाले असून विरोधक काही दिवसांनी त्यांची श्रद्धांजली सभासुद्धा ठेवू शकतात,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले, “विरोधक जे काही आरोप करतायत ते हास्यास्पद आहे. ज्याप्रकारे हे आरोप करतायत ती संस्था खूप जुनी आहे. त्या संस्थेनी सांगितलं होत का हे सगळं करायला? मला वाटत बदलापूर मध्ये ही घटना घडली तेव्हा रेल्वे रोको करायला हे गेले होते आणि फाशीची मागणी करत होते. आज जेव्हा पोलिस त्याला कोर्टात घेवून जात होते, तेव्हा त्यांनी पोलिसांवरती गोळी चालवली. पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी मारलं, त्याचा मृत्यू झाला, विरोधकांना त्याचं सुतक आलं आहे. त्याच्या बद्दलकीची आपुलकी कशी लगेच कशी निर्माण झाली? ज्या नराधमाने चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार केले त्याला शिक्षा मिळालेली आहे. विरोधक काही दिवसांनी त्यांची श्रद्धांजली सभा पण ठेवू शकतात,” असे ते यावेळी म्हणाले.

नरेश म्हस्के यांची विरोधकांवर टीका

यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनीदेखील विरोधकांवर आगपाखड केली. ते म्हणाले, “काल रात्री पोलीस कर्मचारी ज्यांच्यावर हल्ला झाला, ते जखमी आहेत त्यांना भेटायला गेलो होतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, विरोधी पक्ष काहीही टिका करत असेल तरी महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणे आम्ही त्यांना सांगितले. त्या आरोपीला देवाने शिक्षा दिली आहे, करावे तसे भरावे परंतु ज्या आरोपीला तात्काळ फाशी द्या म्हणून बदलापूर, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत होते, त्याच आरोपीची आज बाजू घेत आपल्या निरपराध पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत, दुतोंडी सापासारखे हे वागत आहेत. एखाद्या पोलिसावर त्याने गोळी झाडली तर पोलीस त्याचे स्वागत करणार आहेत का ? २०१९ मध्ये सामनातून तेलंगणा पोलिसांची बाजू मांडली आणि आज आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत याचा आम्ही निषेध करत आहोत. विरोधी पक्ष पोलिसांची बदनामी करत आहे,”असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…

Akshay Shinde Encountar: अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही, या प्रकरणात कोणाला वाचवलं जातय? Sushma Andhare यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version