Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Akshay Shinde Encounter: बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकारी वकिलांवर उच्च न्यायालयाने विविध प्रश्नांचा भडीमार करत, हा एन्काऊंटर होऊच शकत नाही असा दावा केला आहे. एक तर या प्रकरणाबाबत फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा नाही तर आम्हांला वेगळी गंभीर पाऊले उचलावी लागतील अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने दिली आहे.

न्यायालयाकडून प्रश्नांचा भडीमार
पोलीस इतका हलगर्जीपणा कसा करू शकतात ? पोलिसांकडून अक्षयने बंदूक कशी खेचली? सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली? आरोपीला काबू करायला हवे होते, की आरोपीला गोळी का मारली पाहिजे होती ? तीन गोळ्या मारल्या, एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या? याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे? पिस्तूल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली? आरोपीने पिस्तूलचे लॉक ओपन करुन राऊंड फायर केले का? चार पोलीस एका आरोपीला काबू करु शकत नव्हते का? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावले उचलावी लागतील? घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी कोर्टात आहेत का? पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानवाधिकार आयोगाकडे सादर केले का ? असे प्रश्न उच्च न्यायालयाकडून विचारण्यात आले आहेत.

सत्य समोर येणे गरजेचे- उच्च न्यायालयाची भूमिका
अक्षय शिंदे प्रकरणात पोकसोमधील आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेला मारला गेला असा आरोप याचिकाकर्त्यांकडून कोर्टात करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने राज्य सरकारी वकिलांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर उच्च न्यायालयाने म्हंटले आहे की, या प्रकरणातील घटनाक्रम न पटणारा आहे. प्रशिक्षणाशिवाय एखाद्या व्यक्तीला बंदुकीचा स्लायडर चालवता येत नाही, तसेच या प्रकरणात तळोजा कोर्टातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची विचारणा कोर्टाने केली आहे. गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी मारली? पोलिसांच्या कारवाईवर आमचा संशय नाही, परंतु सत्य समोर येणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version