spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“आले रे आले गद्दार आले” पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी दिल्या घोषणा

अजित पवार, आदित्य ठाकरे यांनीही बिस्किटाचे पुढे हातात घेऊन 50-50 चलो गुवाहाटी अशा घोषणा दिल्या.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या आठवड्यातील दुसऱ्या दिवसातील कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्या सत्रामध्येच विरोधी पक्षनेते अजित पवार काहीशा ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. याशिवाय भाजपा आणि फडणवीसांच्या जवळचे असणाऱ्या अभिमन्यू पवारांची कानउघडणी देखील अजित पवारांनी केली.

आज कामकाजाची सुरूवात झाल्यानंतर प्रश्न विचारू न दिल्यामुळे अभिमन्यू पवारांनी थेट अध्यक्षांच जाब विचारला. यानंतर अभिमन्यू पवारांना खडे बोल सुनावत पवार म्हणाले, की, अध्यक्षांना असं धमकाऊ नका. तुमचं म्हणणं मांडण्यासाठी दुसरी आयुध वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही”. अजित पवारांनी समज दिल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी अध्यक्षांची माफी मागितली.

तसेच लक्षवेधीच्या उत्तरामध्ये विधानसभेऐवजी विधानपरिषद लिहिलं असल्यामुळे अजित पवार अधिकाऱ्यावर चांगलेच रागावले. ,ज्या अधिकाऱ्याने ही चूक केली, त्याला हे लक्षात आणून द्या. सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना पगार दिला जातो, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Assembly Monsoon Session 2022) विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात तुफान घोषणाबाजी केली. पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या घोषणा आजही लक्षवेधी ठरल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन 50-50 बिस्कीटचे पुडे घेऊन घोषणाबाजी केली. अजित पवार, आदित्य ठाकरे यांनीही बिस्किटाचे पुढे हातात घेऊन 50-50 चलो गुवाहाटी अशा घोषणा दिल्या. यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना पाहून शिवसेनेच्या आमदारांनी ‘आले आले रे गद्दार आले’ अशा घोषणा देखील दिल्या.

हे ही वाचा:

जाणून घ्या मुंबईच्या लाडक्या वडापावची कहाणी

‘नो टू हलाल’,भोंग्यानंतर मनसेने हाती घेतली नवी मोहीम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss