Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Thackeray vs Shinde : शिंदे गटाला झुकतं माप का?, निवडणूक आयोगाला पत्र लिहत ठाकरे गटाकडून आरोप

चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप देण्यात आले असा गंभीर आरोप करत ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला काही पत्र लिहलं आहेत. तसेच ठाकरे गटाला सापत्न वागणून देण्यात आली आहे. आयोगाकडून आमच्यासोबत भेदभाव झाला असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. या पत्रात एकूण १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत.

नेमकं पत्रात काय म्हटले ?

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगानं चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगानं जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीनं वेबसाईटवर टाकले, असा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळं शिंदे गटाला आमची सगळी रणनिती कळाली, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

हेही वाचा : 

Hijab Ban : हिजाब प्रकरण ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं; कोर्टाच्या निकालात मतभिन्नता झालेल्या निर्णय

निवडणूक आयोगानंच आमची सगळी रणनीती शिंदे गटाकडे उघड केली. आमच्याच यादीतील चिन्ह आणि नावाचे पर्याय शिंदे गटानं कसे सादर केले? हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीमुळंच शक्य झालं, असा आरोपही ठाकरे गटानं या पत्रातून केला आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ असे पर्याय दिले होते. शिंदे गटानेही दिलेल्या पर्यायांमध्ये पहिल्या दोन चिन्हांचा समावेश होता. याशिवाय पक्षाच्या नावासाठी दिलेल्या पर्यायांमध्येही साधर्म्य होते. दोन्ही गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ पर्याय दिला होता.

MNS : मनसे नेत्याचे ऋतुजा लटकेंसाठी एक ट्विट चर्चेत म्हणाले, वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच…

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले होतं. याआधी शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन पर्यायी चिन्हे आयोगाकडे सादर केली होती. ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह खुल्या यादीत नव्हते, ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ होता. शिवाय, ‘त्रिशूळ’ या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटानेही दिला होता. त्यामुळे शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय आयोगाने फेटाळले आणि मंगळवारी नवे तीन पर्याय देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, दिलेल्या चिन्हांमधून आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचे वाटप केलं आहे.

अशा प्रकारचे आरोप असलेलं पत्र थोड्या वेळापूर्वी हे ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात सादर केले.

मुख्यमंत्र्यांकडून मोठा फेरबदल, २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाणून घ्या कुणाची बदली कुठे?

Latest Posts

Don't Miss