Thursday, July 4, 2024

Latest Posts

Rahul Gandhi यांच्या व्यक्तव्यावरुन विधानपरिषदेत राडा, Ambadas Danve, Prasad Lad यांच्यात शिवीगाळ

राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरून विधानपरिषदेत गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आणि याचा शेवट भाजप आमदार प्रसाद लाड आणि शिवसेना उबाठा आमदार अंबादास दानवे यांनी एकमेकांना शिव्या देईपर्यंत झाला.

लोकसभेत आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर जोरदार टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरून विधानपरिषदेत (Maharashtra Assembly Monsoon Session) गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आणि याचा शेवट भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि शिवसेना उबाठा आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एकमेकांना शिव्या देईपर्यंत झाला. यामुळे विधिमंडळाचे कामकाज आज स्थगित करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (सोमवार, १ जुलै) लोकसभेत भाषण देत भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले याचे पडसाद आता देशभरात पडू लागले आहे. याचा प्रत्यय महाराष्ट्र विधिमंडळातदेखील आला. लोकसभेत झालेल्या विषयावर भाजप आमदार प्रसाद लाड विधानपरिषदेत व्यक्त झाले. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत ‘राहुल गांधी यांना इटलीला पाठवून द्या ‘ असे म्हंटले. यावर, लोकसभेतील मुद्यावर बोलून विधानपरिषदेतील कामकाजात व्यत्यय आणण्याची गरज नसल्याचे अंबादास दानवे यांनी म्हणताच प्रसाद लाड यांनी दानवे यांच्याकडे हातवारे केले. त्यावर अंबादास दानवे भडकल्याचे पाहायला मिळाले.

अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याने सभागृहात एकाच गदारोळ झाला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळाचे कामकाज थांबवले. त्यानंतर माध्यमांना बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “माझा तोल सुटलेला नाही. माझयावर बोट केलं तर तोडण्याचा मला अधिकार आहे. मी विरोधी पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे. बाटगा प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? याबद्दल माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधानपरिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही. माझा शिवसैनिक जागा झाला… माझ्यावरसुद्धा केसेस आहेत. यांनी हिंदुत्वासाठी किती केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पाळणारे हिंदुत्ववादी आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss