spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनाला मोठा दिलासा ! विधान परिषदेत विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवेंची नियुक्ती

मुंबई : राज्यात काल नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.परंतु शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात सुरूच आहे. व न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असून पक्षचिन्ह मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

यादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडे राहिल्यानंतर मविआतील अन्य पक्षांनी सहमती दर्शवल्यास अंबादास दानवे यांच्याकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदची जबाबदारी आली.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विधिमंडळ सचिव यांना शिवसेनेच्या वतीने पत्र देण्यात आले होते. या पदावर शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे यांचे नाव पुढे केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या परीने यावर दावा करू शकत होती. महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर विधान सभेचं विरोधी पक्ष नेते पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलंय. अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत.

राज्यातील उठाव नव्हता, गद्दांराचा प्लॅन होता; आमदार अंबादास दानवे 

यावर सुशील कुमार मोदी यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी टीका करताना भाजपने खरे दात दाखवल्याचं म्हटलं. दानवे म्हणाले की, “राज्यात जे घडलं ते भाजपने केलं आणि आता मोदी बोलले तेव्हा सत्य बाहेर आलं. त्यांनी अनेक पक्षांसोबत त्यांनी असंच केलं. त्यामुळे राज्यातील उठाव नव्हता तर हा सगळा गद्दार लोकांचा प्लॅन होता. आता ईडीचे कार्यलय बिहारमध्ये शिफ्ट होईल”, असे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

Cabinet Meeting : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

Latest Posts

Don't Miss