Wednesday, September 25, 2024

Latest Posts

भाजपने ध्यानी ठेवावं की हा महाराष्ट्र आहे, इथे उत्तरेतील आक्रमणे खपवून घेतली जात नाहीत: Ambadas Danve

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते राज्यभर दौरे, बैठका आणि सभांचा धडाका लावत असल्याचे दिसत आहे अश्यातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काल (मंगळवार, २४ सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मराठवाडा विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे काल त्यांनी मार्गदर्शन केले. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अमित शहांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पार्टी व भारताचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल ते छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी एमजीएम कॅम्पस येथे भाजप कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता संवाद बैठक घेतली असून या बैठकीला मराठवाड्यातील आमदार, खासदार व नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली झाली नाही परंतु निराश होण्याची गरज नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या एकूण जागांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची विदर्भातील कामगिरी महत्वाची असून विदर्भात चांगले यश मिळते तेव्हा भाजपची सत्ता येते,” असे ते म्हणाले. तसेच विदर्भात ४५ आणि मराठवाड्यात ३० जागा जिंकण्याचे टार्गेत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.

अमित शहा यांच्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी आज (बुधवार, २५ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागा जिंकायच्या असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कार्यकर्त्यांच्या मनोबलाला तासाभराच्या भाषणाचा कितीही मोठा टेकू दिला तरी हा आकडा महायुतीला गाठता येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे! महाराष्ट्रातील सुरू आंदोलने आपण देशातील अन्य आंदोलनांशी जोडलीत आणि येथील आंदोलकांच्या मागण्यांना वाटण्याचा अक्षदा देण्याचा निर्णय जणू जाहीर करून टाकलाय. पण भाजपने हे ध्यानी ठेवावं की हा महाराष्ट्र आहे. इथे उत्तरेतील असली आक्रमणे खपवून घेतली जात नाहीत,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss