नेहरूंपर्यंत का जाता? माफी तुम्ही, BJP ने मागायला हवी.. Devendra Fadnvis यांच्या वक्तव्यावर Ambadas Danve आक्रमक

नेहरूंपर्यंत का जाता? माफी तुम्ही, BJP ने मागायला हवी.. Devendra Fadnvis यांच्या वक्तव्यावर Ambadas Danve आक्रमक

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काल (रविवार, १ सप्टेंबर) रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडले. यावरून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत विरोधकांवर आरोपांची तोफ डागली आहे. दरम्यान त्यांनी ‘शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हा खोटा इतिहास काँग्रेसने सांगितला’ असे वक्तव्य यावेळी केले. तसेच, “नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेले आहे. त्या संदर्भात कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावरून फडणवीसांवर जोरदार हल्लबोल चढवला आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत फडणवीस यांनी आणि भाजपने माफी मागायला हवी असे म्हणत सात कारणे समोर मांडली. यावेळी ते म्हणाले, “नेहरूंपर्यंत का जाता देवेंद्र फडणवीस जी. माफी तुम्ही.. तुमच्या पक्षाने मागायला हवी.. कशासाठी?

१. श्रीपाद छिंदमच्या महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर..
२. महाराज हे जुन्या काळातील आदर्श म्हणणाऱ्या राज्यपाल कोष्यारीच्या यांच्या बडबडीवर..
३. समर्थ नसते तर छत्रपतींना कोणी विचारले असते या भाजप कार्यकर्ते भगतसिंग कोष्यारीच्या बेतालपणावर..
४. महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली.. सुधांशु त्रिवेदी यांच्या अज्ञानीपणावर..
५. नरेंद्र मोदींना आजच्या युगातील छत्रपती शिवाजी महाराज संबोधणाऱ्या जय भगवान गोयल यांच्या मूर्ख वक्तव्यावर..
६. जिनांच्या कबरीवर जाऊन त्यांना ‘महान व्यक्ती’ म्हणणाऱ्यांच्या लाल कृष्ण अडवाणी यांच्या वक्तव्यावर..
७. हिंदुस्थानी सैनिकांच्या जणू रक्ताने माखलेला केक खात नवाज शरीफला शुभेच्छा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान वळवल्या वरून..

यशवंतराव चव्हाण नेहरूंना प्रतापगडावर घेऊन आले होते. त्यांनी उदघाटन केलेला पुतळा आजही ताठ मानेने उभा आहे. तुमच्या शेठजींचा हात लागलेला आठ महिन्यात पडला. प्रतापगडावर त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणाले हे पण एकदा ऐका आणि इतिहासाची हातचलाखी बंद करा..

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीच्या आंदोलनाबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेले आहे. त्या संदर्भात कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का? कॉंग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशात महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मूक होऊन बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे तेथील प्रदेशाध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला,त्याबद्धल ते एक शब्दही का बोलत नाही. पहिले याचे उत्तर दिले पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीच्या आंदोलनावर भाष्य करत फडणवीस म्हणाले होते कि, “आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं कि शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण महाराजांनी सुरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता. किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होता. पण, सुरत कधी लुटली नव्हती. जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अश्या प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, मग आता त्यांना माफी मागायला सांगणार का?” असे ते म्हंटले होते.

हे ही वाचा:

Exit mobile version