अंगावर पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही, खरा वाघ मातोश्रीवर बसलाय: सिनेट निवडणुक निकालावरून Ambadas Danve यांचा हल्लाबोल

अंगावर पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही, खरा वाघ मातोश्रीवर बसलाय: सिनेट निवडणुक निकालावरून Ambadas Danve यांचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा (Mumbai University Sinate Election) निकाल काल (शुक्रवार, २७ सप्टेंबर) जाहीर जाहीर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा (Yuvasena) वरचष्मा दिसून आला. १० पैकी १० जागांवर युवासेनेचे उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला. सकाळी ९ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात वैध आणि अवैध मतांची विभागणी करुन विजयी कोटा निश्चित करण्यात आला. मतमोजणीनंतर युवासेनेने सर्वच्या सर्वजागा काबीज केल्याचे स्पष्ट झाले. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) चांगलीच आगपाखड केली आहे.

अंबादास दानवे यांनी आज (शनिवार, २८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी ते म्हणाले, “निरपेक्ष, बॅलेटवर निवडणूका लागल्या की असाच निकाल लागणार. मुंबईत शिवसेनेची ताकत आहे, या निवडणुकीत मोठा गॅप असून आमचा मोठा विजय आहे. या देशात दिल्लीच्या पदपातशाही विषयी कुणी आवाज उठवला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी उठवला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांना हरवले, भाजप, शिंदे आणि मनसे असताना आदित्य ठाकरे यांच्या नेतृ्त्वात पराभूत केले आहे. आम्ही वाघ आहोत असे म्हणत असतात ना तर त्यांना सांगेल की अंगावर फक्त पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही खरा वाघ मातोश्रीवर बसला आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

बॅलेट पेपरवर निवडणुका संदर्भात ते पुढे म्हणाले, “जगात अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीन बंद पडून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आहेत. कुणी ही मतदान केले तर त्यांना इलेक्ट्रिक मशीन वर विश्वास नसतो.”

अब्दालीच्या फौजदारांनो… अंबादास दानवेंचे ट्विट चर्चेत

सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटदेखील केलं आहे. “अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यानो.. अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! आता करत बसा.. ‘नरेटिव्ह.. नरेटिव्ह..’ अशी खरमरीत टीका दानवे यांनी केली.

हे ही वाचा:

सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंध्यांचे काही चालले नाही, सिनेट निवडणुकीत एकतर्फी विजयानंतर Sanjay Raut यांचा CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version