spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) नवी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘सर्वधर्मसमभाव मानायचा नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करायची शपथ घ्या,” असे आवाहान त्यांनी उपस्थितांना केले होते. यावरून आता रायाजकारण चांगलच तापलं असून विरोधकांकडून नितेश राणेंवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. अश्यातच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावरून नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. नितेश राणे त्यांच्यावर टिका करत, “गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक आहे! ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल, तेव्हा तुम्ही कदाचित असे बोलणार नाहीत,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

अंबादास दानवेंचे नितेश राणेंना तीन सवाल

अंबादास दानवे यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका करात आपल्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली. त्यात त्यांनी नितेश राणे यांना त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर तीन प्रश्न विचारले. ते म्हणाले, “ओके, ठीक आहे! मग या प्रश्नांची उत्तरे द्या नितेश राणे जी!

१. हिंदुस्थान आणि अरब राष्ट्रांमधील व्यापाराची उलाढाल १६२ मिलियन यूएस डॉलर्स आहे. त्यांच्याकडून तेल घेणे बंद केल्यावर आपण बैलगाडीत फिरणार आहात का?

२. आखाती राष्ट्रांत राहणाऱ्या ७० लाख आपल्या देशबांधवांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय तिकडे घेतला गेला तर ही बेरोजगारांची फौज कुठे नेणार आहात?

३. हिंदुस्थानला लागणारे ६० टक्के क्रूड ऑईल आखाती राष्ट्रे पुरवतात. मग ही तूट कुठून भरून काढणार आहात?

गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक आहे! ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल, तेव्हा तुम्ही कदाचित असे बोलणार नाहीत..” असे ते म्हणाले.

नितेश राणे यांचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य काय?

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात गुरुवारी (१२ सप्टेंबर) बोलताना नितेश राणे म्हणाले, “फक्त हिंदूंशीच व्यवहार करा. सर्वधर्मसमभाव मानू नका. माझया सहकाऱ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे कि मी जो काही व्यवहार करेल, तो फक्त हिंदूंशीच करेन.” नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देत, “हिंदूंची बाजू घेणे म्हणजे दंगल भडकावणे नाही. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना पाठबळ दिले. आम्ही राष्ट्रप्रेमी मुस्लिमांच्या विरोधात नाही,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधान निर्मितीचा इतिहास युवा पिढीला समजावा, हाच आमचा प्रयत्न – Mangal Prabhat Lodha

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss