राज्यात द्वेष वाढवण्याचं काम हे PM Narendra Modi करत आहेत: Ambadas Danve

राज्यात द्वेष वाढवण्याचं काम हे PM Narendra Modi करत आहेत: Ambadas Danve

सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (शुक्रवार, ३० सप्टेंबर) जाहीर माफी मागितली. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसवर टीका करत, “मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत आहे. परंतु, वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही तुम्ही माफी मागायला तयार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत,”ते राज्यात द्वेष वाढवण्याचं काम करत आहेत,” असे वक्तव्य केले.

अंबादास दानवे यांनी आज (शनिवार, ३१ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यात एकप्रकारे द्वेष वाढवण्याचं काम हे मोदीजी करत आहेत. वाढवण बंदराला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंडा फिरवण्याच काम मोदीजी करत आहेत. मोदीजींच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यात झालेले व्यवहार, बदलले टेंडर यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराचा विळखा आहे. एकप्रकारे पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उशिराने माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाही मध्ये कलम केलं जातं, तशाप्रकारे मोदीजींच्या सरकारच या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही,” असे ते म्हणाले.

महायुती सरकारवर टीका करत ते पुढे म्हणाले, “महायुती सरकारने गेल्यावर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यावेळी ६० हजार कोटींच्या कामाची घोषणा केली. मात्र त्यातील ६० कोटी रुपयांचे सुद्धा काम झाले नाही. कोकणातून मराठवाडा वॉटर ग्रीड साठी पाणी आणण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार होते. मात्र त्याचेही काही झाले नाही. सरकार एकप्रकारे मराठवाडयातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करत आहे. सरकार मागचा पाढा गिरवण्याचं काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावं,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Veer Savarkar यांना भारत रत्न देऊन का सन्मानित केलं नाही? त्याबद्दल सावरकरांची माफी मागा; Sanjay Raut यांचा PM Modi यांना टोला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, ‘लवकरच राजकोट किल्ल्यात…’

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version