Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Ambadas Danve यांना शिवीगाळ भोवली; पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबित

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) विधानपरिषद आमदार आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना प्रसाद लाड (Prasad Lad) यांना केलेली शिवीगाळ भोवली असून आज (मंगळवार, २ जून) विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांना पाच दिवसांसाठी विधान भवन (Maharashtra Vidhan Bhavan) परिसरात फिरकण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे.

लोकसभेत आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर जोरदार टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरून विधानपरिषदेत (Maharashtra Assembly Monsoon Session) गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आणि याचा शेवट शिवीगाळ करून झाला. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवसेना उबाठा आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवी दिल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावर निर्णय घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी निलंबित केले आहे. तसेच निलंबन पूर्ण होईपर्यंत विधानभवन परिसरात फिरकण्याससुद्धा अंबादास दानवेंवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील नेते आक्रमक झाले आहेत.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss