Thursday, July 4, 2024

Latest Posts

Ambadas Danve यांनी पत्र लिहीत मागितली माफी, निलंबनाचा फेरविचार करण्याची केली विनंती

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. सोमवार (१ जुलै) रोजी विधानपरिषदेत झालेल्या गोंधळानंतर अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवीगाळ केले होते. काल (मंगळवार, २ जुलै) विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले असून निलंबनाच्या काळात विधान भवन परिसरातदेखील येण्यास बंदी घातली आहे. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच दानवेंचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी करत शिवसेना उबाठा विधानपरिषद आमदारांनी विधानपरिषदेच्या कामावर बहिष्कार टाकला. त्यात आता अंबादास दानवे यांनी उपसभापतींना पत्र लिहीत माफी मागितली आहे.

अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हंटले आहे कि, “मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटॊकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु १ जुलै रोजी माझयाकडून अनवधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, यासंदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभापगृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाचे दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझया मनात कोणतेही किंतुपरंतु नाही.”

“सभागृहाचे कामकाज सुरु आहे. या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माताभगिनी यांचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरून सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माताभगिनींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझया निलंबनाचा फेरविचार करावा, हि विनंती.”

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात व्यक्तव्य करत; “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा… द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेत उमटले प्रसाद लाड यांनी याविरोधात आवाज उठवला असता अंबादास दानवे सोबत त्यांची बाचाबाची झाली आणि याचे पर्यवसन शिवीगाळीत केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राज्यातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” CM Eknath Shinde यांनी केल्या ‘या’ अटी रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss