अँम्ब्युलन्सला देखील अमित शाहांच्या जाण्याची पहावी लागली वाट; व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे १-२ दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच यांच्या मुंबई दौऱ्याची चर्चा देखील चांगलीच रंगली आहे.

अँम्ब्युलन्सला देखील अमित शाहांच्या जाण्याची पहावी लागली वाट; व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे १-२ दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच यांच्या मुंबई दौऱ्याची चर्चा देखील चांगलीच रंगली आहे. अमित शाह यांनी लालबागचा राजाचे (Lalbaug Raja Ganpati) दर्शन घेतलं. तसेच, काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाच्या (Ganesh Darshan) दर्शनासाठीही ते उपस्थिती होते. अनेक राजकीय बैठका देखील झाल्या. परंतु सध्या अमित शहा हे आणखी जास्त मोठया प्रमाणात चर्चेत आले आहेत.

अमित शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केलेल्या कठोर टीकेवरून त्यांची चांगलीच चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केवळ राजकाीय गाठीभेटींमुळेच नव्हे तर आणखी एका गोष्टींमुळे सध्या चर्चेत आहेत. अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी एका अँम्ब्युलन्सला रस्त्यावर रोखून धरण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे कि अमित शाह यांच्या गाड्यांचा ताफा हा जात आहे परंतु त्यांच्यासाठी सर्व गाड्या या रोखण्यात आलाय आहेत आणि त्याच सोबत एका अँम्ब्युलन्सला देखील थांबविण्यात आले आहे. मुंबई अमित अमित शाह आले म्हणून अनेक रस्ते हे बंद करण्यात आले पण त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर पडत होता.

हे ही वाचा :

आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी

राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीमुळे शिवसेनेला टेन्शन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version