spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Amit Shah Birthday: गृहमंत्री अमित शहांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त PM मोदींसह सर्व नेत्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी वयाची ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९६४ मध्ये या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांचा जन्म झाला. शहा यांचा जन्म मुंबईत एका वाण्याच्या घरी झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले आणि हीच त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात मानली जाते. गांधीनगर जिल्ह्यात मनसा नावाचं एक छोटं शहर आहे. इथूनच त्यांनी तरुण स्वयंसेवक म्हणून सुरुवात केली. हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण होतं. यानंतर अमित शहा महाविद्यालयीन शिक्षणासाठी अहमदाबादला गेले. तिथे त्यांनी अभाविपचं सदस्यत्व घेतलं.

मुकेश अंबानीच्या पुत्राने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

१९८२ साली बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना त्यांना अभाविपच्या अहमदाबाद शाखेचं सचिवपद मिळालं. यानंतर ते भाजपच्या अहमदाबाद विभागाचे सचिव झाले आणि तिथून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांना पक्षाने राज्यातील अनेक महत्त्वाची पदं दिली. भारतीय जनता युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष असताना १९९७ साली त्यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हा पासून शहा भाजपशी एकनिष्ठ राहून गृहमंत्री पदा पर्यंत त्यांचा राजकीय प्रवास सुरु आहे.

 हेही वाचा : 

पंतप्रधान मोदी आज घेणार रोजगार मेळा, ७५,००० लोकांना मिळणार नियुक्ती पत्र

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले की, ते देशाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न करत आहेत. यासोबतच भाजपच्या अनेक नेत्यांनीही माजी अध्यक्ष शहा यांचे अभिनंदन केले. पीएम मोदींनी ट्विट करून म्हटले की, ‘भारताचे गृहमंत्री म्हणून ते आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न करत आहेत. ते महत्त्वाचे सहकारी क्षेत्र सुधारण्यासाठी प्रशंसनीय कार्य करत आहेत आणि आपल्या देशाच्या सेवेत त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो. अशा प्रकारे दिग्गज नेत्यांनी शहा यांचे अभिनंदन केले.

शाह यांचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “शहा भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी समर्पित रीतीने काम करत आहेत आणि त्यांना सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतात.” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भूपेंद्र यादव यांनीही गृहमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

Latest Posts

Don't Miss