शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा वेगळा असा गट राजकारणात तयार केला. एकनाथ शिंदेंची शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर त्यांच्या सह आलेल्या नेत्यांनी ददेखील त्यांना साथ दिली म्हणूनएकनाथ शिंदे याना शक्य झाला यात काही शंकाच नाही. त्यांनतर त्यांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील न्यायालयाकडून देण्यात आले कारण त्यासाठी त्यांनी दावा केला होता आणि त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झाले . मात्र आता कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद तयार होत आहे. वाद संपण्याचे चिन्ह काही दिसत नाही. यातच ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला, तर दुसरीकडे डोंबिवलीत भाजपने पत्रकार परिषद घेत मानपाडा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकाऱी नंदू जोशी यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले असून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बैठक घेतली होती त्यावेळी पूर्वेतील भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कल्याण लोकसभेत – भाजप विद्धध शिवसेना (शिंदे गट ) असे चित्र दिसू लागेल.दरम्यान कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नाही आहे.यातच ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा भाजपच्या नेत्याने केले. तर डोंबिवलीत भाजपने पत्रकार परिषद घेत मानपाडा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डोंबिवलीत रविवारी भाजपने पत्रकार परिषदघेऊन यावेळी मानपाडा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की शेखर बागडे यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप करत ईडी आणि आणि सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असे सांगितले.

डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाला. यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी शिवसेने विरोधात दंड लावले आहेत. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक नेत्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होत नाही, तोपर्यंत शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा ठराव देखील संमत केला. यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी काही लोक युतीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप केला. तसेच आपला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली. हा वाद चिघळल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं. मात्र, भाजपच्या नेत्यांनी रविवारी (११ जून) ठाण्यातील मेळाव्यात आक्रमक भूमिका घेतली. तसेच ठाणे, कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.

हे ही वाचा:

अमित शहा यांचं तामिळनाडूत मोठे वक्तव्य

Cyclone Biparjoy:हवामान खात्याकडून भारताच्या किनारपट्टीला बिपरजॉयचा धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version