spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमित शहा यांचं तामिळनाडूत मोठे वक्तव्य

राज्यामध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागल्याने सगळ्याच पक्षात पक्षात आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये आढावा बैठक घेतल्या जात आहे. त्याचप्रमाने पक्षाकडून कार्यकर्त्याचा बैठकही घेण्यास सुरवात केली आहे. पक्षामधील बड्या नेत्यांना हाताशी धरून पक्षाकडून पक्ष बांधणी आणि नियोजन हे आखले जात आहे. जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात मतमोजणी आणि इतर कामे हि मार्गी लावता येतील. यातच महाविकास आघाडी, बाजप आणि इतर पक्षामाहे येणाऱ्या निवडणुकांवर रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठं वक्तव्य केल्याचा दिसून आले. आणि त्यामुळे पुंड राजकारणात चर्चाना उधाण सुरवात झाली आहे.

सद्य स्थितीला झालेल्या कर्नाटक निवडणुकांचं आढावा घेतला तर तिकडे भाजपचा दारुण पराभव झाला. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजप सरकारला काही आपली सत्ता स्थापन करता आली नाही. तर कर्नाटकात अपेक्षा होत्या, मात्र काँग्रेसनं सुरवातीच्या मतमोजणीपासूनच एकहाती सत्ता मिळवत, तिथूनही भाजपची हकालपट्टी केल्याचं दिसून आले. अशातच दक्षिणेकडून हद्दपार झाल्यानंतर भाजपनं पुन्हा दक्षिणेत पाय रोवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं दिसतंय, ते अमित शाहांच्या वक्तव्यामुळे. दक्षिणेतील राज्यांमध्ये सततच्या पराभवानंतर अमित शाह यांनी तामिळ पंतप्रधानांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शाह म्हणाले की, आपण तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली आहे. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले अमित शाह चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे.

गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान व्हायला हवं, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितलं. पक्षाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच तामिळनाडू दौऱ्यात तामिळ स्वाभिमानाचा जयघोष केल्यानंतर अमित शहा यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे जाहीर सभा घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “यूपीए सरकारनं १० वर्षात १२ लाख कोटींचा घोटाळा केला. आजपर्यंत ९ वर्षांच्या मोदी सरकारवर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. द्रमुक आणि त्याचे दिवंगत प्रमुख एम. करुणानिधी यांची खिल्ली उडवत त्यांनी तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. कामराज आणि जी.के. मूपनार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता होती, पण करुणानिधी यांनी त्यांची शक्यता हाणून पाडली, असंही अमित शाह म्हणाले. यूपीए सरकारच्या काळात ‘आलिया, मालिया जमालिया’. ‘पाकिस्तानातून येथे घुसून बॉम्बस्फोट घडवून आणायचे. मनमोहन सरकारमध्ये त्यांच्याविरुद्ध काहीही करण्याची हिंमत नव्हती. या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या सरकारनं देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याचं काम केलं आहे.

हे ही वाचा:

Cyclone Biparjoy:हवामान खात्याकडून भारताच्या किनारपट्टीला बिपरजॉयचा धोका

रोखठोककार संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रंगतदार सामना | Sanjay Raut |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss