युती टिकवण्यासाठी अमित शहांचे प्रयत्न; थेट मुख्यमंत्र्यांना फोन

जेडीयूने मंगळवारी सकाळी 11 वाजता पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे.

युती टिकवण्यासाठी अमित शहांचे प्रयत्न; थेट मुख्यमंत्र्यांना फोन

BJP and JDU Alliance

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील तडे वाढत असताना, मुख्यमंत्री आणि जनता दल-युनायटेड (जेडीयू) नेते नितीश कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला, दोन्ही नेत्यांनी फोनवर काही वेळ बोलले, अशी माहिती आता समोर येत आहे.

भारतीय जनता पक्ष (भाजप) वेट अँड वॉच स्थितीत असताना, जेडीयूने मंगळवारी सकाळी 11 वाजता पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. तसेच, विरोधी पक्षाकडून, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपापल्या आमदारांना त्याच दिवशी चर्चेसाठी बोलावले आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जेडीयू भाजपपासून फुटून काँग्रेस आणि आरजेडीशी हातमिळवणी करण्याबाबत आहे.

मागच्या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींवर नजर टाकली तर भाजप आणि नितीश कुमार यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महिनाभरात 4 वेळा नितीश कुमार यांनी भाजपपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार दोन आठवडे आधी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, यानंतर 3 ऑगस्टला त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.

यांनंतरदेखील, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा २२ जुलै रोजी निरोप समारंभ आणि २५ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी समारंभ यासह – अशा तीन कार्यक्रमांमध्ये कुमार आपली उपस्थिती दर्शवण्यात अयशस्वी ठरले ज्यात निमंत्रण थेट हाय कमांडकडून आले होते.

 

Exit mobile version