spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमित शाह यांचा महाराष्ट्रातला दुसरा दौरा ; एकनाथ शिंदे जाणार स्वागतासाठी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी रात्री नागपूरमध्ये येणार आहेत. एका महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहांच्या हस्ते होणार आहे. मुंबई दौऱ्यानंतर आता अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी रात्री नागपूरमध्ये येणार आहेत. एका महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहांच्या हस्ते होणार आहे. मुंबई दौऱ्यानंतर आता अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. यामध्ये ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करणार आहेत. पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या मोठ्या हालचाली दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. आजपासून अमित शहा दोन दिवस नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर आता अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस (Police) आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.आज रात्री अमित शाह नागपूरात (Nagpur) दाखल होणार आहेत. अमित शाह यांच्या पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये पोहोचणार असल्याची माहिती समजते. अमित शहांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांच्या जवळीकतेची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, अमित शाहांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.अशातच राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

अमित शहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे. पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेलीय. २ डीसीपी बाहेरून बोलावण्यात आले आहेत. तर ५० पोलिस निरिक्षक आणि १५० पोलीस उपनिरीक्षक, २ हजार पोलीसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी असणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना इतर मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.त्यामुळे आता अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये कोणत्या प्रकारच्या नेमक्या चर्चा होणार आहे हे समजणे जास्त महत्वाचे ठरते आहे. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार ? आणि त्यानंतर राजकारणात त्याचा काय परिणाम होणार ? हे पाहणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : 

अजितदादा भावी मुख्यमंत्री झळकले मुंबईत बॅनर

एकनाथ शिंदे करतायत डबल ड्युटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss