Saturday, July 6, 2024

Latest Posts

स्टंटबाजीच्या नादात बाबासाहेबांचा अपमान, नाक घासून माफी मागा; Amol Mitkari यांची Jitendra Awhad यांच्यावर टीका

अनावधानाने जितेंद्र आव्हाड यांच्या हातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांचे फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज (बुधवार, २९ मे) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृती दहन करून आंदोलन केले. यावेळी अनावधानाने त्यांच्या हातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांचे फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच खवळले असून महायुतीच्या नेत्यांनी आव्हाडांच्या या कृतीचा जाहीर निषेध केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी असे आवाहनदेखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. अश्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या घटनेवरून अमोल मिटकरी म्हणाले, “स्टंटबाजीच्या नादात आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले ही फार मोठी चूक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाहिला ही चूक अक्षम्य आहे. याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतली आहे. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून राष्ट्राचा अवमान केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. २४ तासात माफी मागावी किंवा महाडमध्येच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासावे, ” असे ते म्हणाले.

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असून आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी याची माहिती दिली. जितेंद्र आव्हाड यांनी “आज मी माफी मागतोय कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील, हा विश्वास आहे, ” असे म्हणत दिलगिरीही व्यक्त केली आहे. परंतु आता या घटनेला मोठे राजकीय वळण प्राप्त झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. तसेच मनुस्मृतीविरोधातील आंदोलन त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

महाड येथे “मनुस्मृती” चे दहन करत Jitendra Awhad यांचे आंदोलन

Soniya Duhan यांच्या आरोपांवर Jitendra Awhad यांचे प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss