आता बस्स झालं… नाहीतर आता आमचा संयम सुटेल, राष्ट्रवादीवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे Amol Mitkari आक्रमक

आता बस्स झालं… नाहीतर आता आमचा संयम सुटेल, राष्ट्रवादीवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे Amol Mitkari आक्रमक

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्या असल्या तरी महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. अश्यातच कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं. परंतु त्याच्या या विधानाला विरोधकांनी मात्र चांगलंच फैलावर घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तानाजी सावंत यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. आता बस्स झालंय… आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटकपक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे आता महायुतीतला संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “आता बस्स झालंय… आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटकपक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नाही. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आता या दोन्ही पक्षांच्या लोकांना यावर घालावा. नाहीतर आता आमचा संयम सुटेल. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे कि संस्था हेच माहीत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार?” असा टोला अमोल मिटकरी यांनी यावेळी लगावला.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुतीत काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच महायुतीमधील धुसफूस आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आता यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तानाजी सावंत यांच्यावर कारवाई व्हावी नाहीतर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी राष्टवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

तानाजी सावंत यांचा नागरिकांशी सांवाद साधतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. यामध्ये ते म्हणतात, “आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये असलो तरी पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो कि उलट्या होतात. आपल्याला त्यांची ऍलर्जी आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

हे ही वाचा:

भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे; Devendra Fadnavis

शरद पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास दिला नकार, CRPF अधिकाऱ्यांना केले परत, सविस्तर घ्या जाणून

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version