अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

अमरावती शहरात पुन्हा एकदा आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळाली. एका मुलीला पळून आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप खासदार नवनीत राणा हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पीडित मुलीला समोर आणा अशी मागणी ही त्यांनी केली. लग्नानंतर मुलीला दाबून ठेवल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरड केल्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या प्रकरणी कांदे व बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सर्वात मोठी अपडेट, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

यावेळी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासात चालढकल होत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणावे अशी मागणी करत पोलिसांनी या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का लावला असा सवालही राणा यांनी उपस्थित केला. यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचाही आरोप केला. ‘मी याप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला, हे विचारण्यासाठी पोलिसांना फोन केला तेव्हा माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. राज्य सरकारने तुम्हाला माझा फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार दिलेत का, हे मला सांगा.’असे म्हणत नवनीत राणा यांनी प्रचंड आकांडतांडव केले. त्यामुळे या पोलीस स्टेशनमधील ठाणेदारांचा संयमही सुटला. त्यांनी नवनीत राणा यांना उद्देशून या सगळ्यांना आधी इथून बाहेर काढा, असे सांगितले. त्यामुळे नवनीत राणा आणखीनच संतापलेल्या दिसून आल्या.

आता कारमध्ये देखील सर्वाना सीट बेल्ट बंधनकारक – नितीन गडकरी

नवणीत राणा यांनी आरोप करताना म्हटले, ‘अशा प्रकरणामुळे अमरावतीची बदनामी का होत आहे. १९ वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणलं आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मात्र मुलगी कुठं आहे याबाबत उत्तरं दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथं पकडून आणा, एका तासात सगळं बाहेर येईल, असंही राणा म्हणाल्या. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम दिला असल्याचं राणा म्हणाल्या. या मुलांचा एक समूह आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

अँम्ब्युलन्सला देखील अमित शाहांच्या जाण्याची पहावी लागली वाट; व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल

Exit mobile version