Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह संकुलात भाजप खासदार मनोज कोटक यांच्या तर्फे प्रेरणा रास गरबाचे आयोजन करण्यात आले होते. या गरब्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी गरब्यात ठेका धरत गरबा ही खेळला. त्याबरोबर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अमृता फडणवीसांना तुम्ही दसरा मेळाव्यातलं कोणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, पॉलिटिकली आपल्याला प्रत्येक नेत्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं चांगलं असतं. तर मी प्रत्येकाचं, दोघांचं ऐकीन. पण वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत. पण मी दोघांचंही ऐकेन. यानंतर गर्दी कुठे होईल असं विचारलं असता, एकनाथ शिंदे जिंदाबाद अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : 

Navratri 2022 : लालबागची माता नवरात्रोत्सवनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी दसरा मेळावे ऐकण्यास तयार असल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र, फडणवीस यांनी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नसल्याचे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या बाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. म्हणाले, ‘मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. त्यावेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, दोन्ही दसरा मेळावा अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार.’ अशा इशार फडणवीस यांनी दिला आहे.

Black Panther 2 Trailer : बहुचर्चित ‘ब्लॅक पॅंथर २’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Exit mobile version