Amruta Fadnavis : “भक्तीत तल्लीन व्हा…” दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांच्या नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Amruta Fadnavis : “भक्तीत तल्लीन व्हा…” दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांच्या नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. करोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या धुमधडाक्यात सर्व ठिकाणी दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. जल्लोष, दिव्यांचा प्रकाश, आतिषबाजी, रांगोळी आणि ठिकाठिकाणी केलेली सजावट यामुळे सर्व महाराष्ट्र उजळून निघाला आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या आवाजात लक्ष्मीपूजनानिमित्त लक्ष्मीची आरती सादर करण्यात आलीय आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका व्हीडिओतून या आरतीची झलक पाहायला मिळतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची अनेक गाणी आजवर रिलीज झालीत. यावेळी दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं त्यांनी सादर केलेल्या आरतीची सध्या चर्चा आहे.

हेही वाचा : 

Lakshmi Pooja : लक्ष्मी पूजन करण्यासाठी योग्य मुहूर्त आणि पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलिज झाले असून त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. ॐ जय लक्ष्मी माता … असे या गाण्याचे बोल असून युट्युबवर हे गाणं व्हायरल झाले आहे. त्याला आतापर्यत मोठ्या प्रमाणावर कमेंटस मिळाल्या आहेत. आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या गाण्याची झलक असलेला एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. दिवाळी आणि लक्ष्मी पुजनाच्या निमित्ताने त्यांनी हे गाणे व्हायरल करुन चाहत्यांना, नेटकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

घरच्या घरी बनवा चविष्ट ब्रेड मिसळ

अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये “दिवाळी २०२२ आणि लक्ष्मी पूजेच्या शुभप्रसंगी माझी लक्ष्मी मातेसाठीची आरती ऐका आणि देवीच्या भक्तीत तल्लीन व्हा, प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता …!” असे कॅप्शन त्यांनी या ट्वीटला दिले आहे. युट्यूबवरील या गाण्याला १ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट करत ते गाणे फार चांगलं झाल्याचे सांगितले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करताना फार छान, दिपावलीच्या शुभेच्छा असे म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी गायलेले हे गाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Diwali 2022 : लक्ष्मीपूजन कसे केले जाते…

Exit mobile version