इतर व्यवसायांप्रमाणे देह विक्रीला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या; अमृता फडणवीस

देशातील इतर व्यवसायांप्रमाणे देह विक्री या व्यवसायाला देखील तितकीची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असं वक्तव्य करत त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

इतर व्यवसायांप्रमाणे देह विक्रीला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या; अमृता फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत येत असतात. अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या वक्तव्यातून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करताना दिसून येतात. देशातील इतर व्यवसायांप्रमाणे देह विक्री या व्यवसायाला देखील तितकीची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असं वक्तव्य करत त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

अमृता फडणवीस पुण्यातील बुधवार पेठेत महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीर तसंच मुलींसाठी सुकन्या कार्ड चा वाटप करण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी अमृता यांनी महिलांना संदेश दिला की सरकारला मी सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो तसाच देहविक्रीला देखील उच्च दर्जा आणि आदर मिळाला पाहिजे.

जर्मनीसारख्या देशात त्याकडे खूप रिस्पेक्टने पाहिले जाते. त्यावर टॅक्स वसुल केला जातो. आपल्याकडेही ते व्हायला पाहिजे. असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुलींना कसला त्रास होत असेल तर तुम्ही त्यावर विरोध करा आम्हीं तुमच्या सोबत आहोत. देहविक्री करणाऱ्या महिलांनी त्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या आणि नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घ्या. असं त्यांनी कार्यक्रमात सांगितले. त्यांचे हे वक्तव्य सध्या देशभरात चर्चेत ठरताना दिसून येतंय.

सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायाला परवानगी दिली आहे. भारतीय संविधानानुसार आता वेश्यांनाही व्यवसाय करण्याचा अधिकार असून त्यांना त्यापासून कोणी रोखू शकत नाही. अशा प्रकारचा निर्णय दिला. त्याचबरोबर त्यांनी या निर्णयात काही अटी देखील घातल्या आहेत. मात्र, असे असले तरी या महिलांना अनेक समस्या आहेत.

Exit mobile version