भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुर्णविराम

भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुर्णविराम

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर सर्व स्थरावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची (resignation) मागणी केली जात आहे. जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होऊन आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. पण, राजभवनाकडून या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या स्पष्टीकरणामुळं राज्यपालांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून (From Raj Bhavan) सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता पुन्हा हा वाद वेगळं वळण घेणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांनी पैसा काढून घेतला तर काही राहणार नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाबाबत… आणि नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, अशी विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे.

तर आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषदेतून पुढची भूमिका मांडली. महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची वेगवेगळ्या पद्धतीने अवहेलना होत असते. तरीही त्याबद्दल कोणीही भूमिका मांडत नाही. महाराजांची अवहेलना केली म्हणून त्याबद्दल वाईटही का वाटत नाही असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर केला आहे. भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्यव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे यानंतर आम्ही ३ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही विचार मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Shraddha Murder Case मोठी बातमी! श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला

राहुल गांधींना मोठा धक्का, रणजीत सावरकर यांचा मोठा दावा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version