मुख्यमंत्री शिंदे नागपुरात दाखल होण्यापूर्वीच, विमानतळावर कर्नाटकची माहिती देणारे पोस्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे नागपुरात दाखल होण्यापूर्वीच, विमानतळावर कर्नाटकची माहिती देणारे पोस्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विमानतळावर कर्नाटकमधील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पोस्टर झळकले आहेत.

कर्नाटकच्या पर्यटन विभागाकडून हे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर या पोस्टरवर कर्नाटक नव्याने पाहूया अशा आशयाचा पोस्टर आहे. या पोस्टरवर कर्नाटक मधील पर्यटन स्थळ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. तर आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेत हे पोस्टर झळकले त्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

हे सर्व पोस्टर नागपूर विमानतळाबाहेरील रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाला तोंड फुटलं आहे. हा वाद थांबण्याचं नावचं घेत नाही. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपूरला येणार आहेत. तेव्हा नागपूर विमानतळाबाहेर कर्नाटकमधील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पोस्टर कर्नाटक सरकारकडून लावण्यात आले आहेत. नागपूर विमानतळावर कर्नाटक मधील पर्यटन स्थळाची माहिती देणारे अनेक पोस्टर्स नागपूर विमानतळा बाहेरच्या ॲप्रोच रोडवर लावण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा प्रवास सोबत करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेणार आहेत. अशातच या दौऱ्याआधी मुंबईवरून नागपूर विमानतळावर त्यांचं आगमन होणार असून नंतर ते समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विमानतळावर कर्नाटकमधील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पोस्टर झळकले आहेत.

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

Indian Navy Day 2022 का साजरा केला जातो ४ डिसेंबरला ‘भारतीय नौदल दिन’ ?, जाणून घ्या माहिती

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version