spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदेंवर केली टीका

कल्याण डोंबिवली मतदार संघामध्ये सध्या निवडुकीचे वारे वाहत असताना कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप मध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहेत.

कल्याण डोंबिवली मतदार संघामध्ये सध्या निवडुकीचे वारे वाहत असताना कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप मध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहेत. तसेच नहजप आणि शिवसेना हे दोघे एकत्र निवडणूक लढविणार जोते. तर काही दिवसांपूर्वी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार अशा चर्चाना उधाण आले हिते. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली मतदार संघात साभार निर्माण झाला आहे. आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कल्याण लोकसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी नेते आनंद परांजपे यांनी खा.डॉ.शिंदेवर टीका केली आहे. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा. तसेच भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले, मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले आहे. त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.

त्यामुळे कल्याण लोकसभेत – भाजप विरूद्ध शिवसेना (शिंदे गट ) असे चित्र दिसू लागले आहे.यावरच खासदार शिंदे यांनी उत्तर देत सांगितले की २०२४ साली मा. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी भाजपकडून कसून प्रयत्न सुरु आहेत. परंतु,काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले, मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर, माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, कल्याण लोकसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे प्रतिक्रिया दिली आहे.परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक वर्षापासून जेव्हापासून शिंदे गटाचे सरकार आलेलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, या ठिकाणी सातत्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये हे वाद चालूच आहेत.

ठाण्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असलेल्या प्रशांत जाधव याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच प्रमोद चव्हाण, दिव्यातील भाजपचे रोहिदास मुंडे यांना त्रास दिला गेला. त्यामुळे उच्च पातळीवर जरी भाजपा आणि शिंदे गट एकत्र असले तरी देखील खालच्या पातळीवर मात्र हे चित्र शिंदे गट विरुद्ध भाजप हा संघर्ष सातत्याने चालूच आहे. तरी देखील राक्षसी महत्वकांशी पोटी, सत्तेच्या लालसेपोटी आणि गद्दारीमुळे जे सरकार महाराष्ट्रात एक वर्षांपूर्वी आलं ते राजीनामा देतील का? अशी टीका परांजपे यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss