Andheri By-election 2022 : निवडणूक बिनविरोध लढवण्याच्या निर्णयावर प्रभाव कोणाचा? ठाकरे की पवार

Andheri By-election 2022 : निवडणूक बिनविरोध लढवण्याच्या निर्णयावर प्रभाव कोणाचा? ठाकरे की पवार

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली आहे. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनवोरध होईल का? याकडे लक्ष लागलं होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळेंनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्रातचे प्रभारी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली दिसून आल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

परंतु आता राजकीय वर्तुळात एका वेगळायच्या चर्चेला उधाण आले आहे. काल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अनुसरुन माघार घेण्याची विनंती केली होती. मात्र शरद पवारांनी राज ठाकरेंच्या पत्रातील हवा काढून घेतली का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

हेही वाचा : 

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेलांची पहिली प्रतिक्रिया…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रविवारी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक परंपरेला अनुसरुन आणि स्व. रमेश लटके यांचे काम पाहता उमेदवार देऊ नये, असं राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटले. त्यानंतर भाजपच्या बैठका सुरु झाल्या.

त्याचबरोबर कालच संध्याकाळी अचानक शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपने उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी शरद पवारांनी २०१४ सालच्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीची आठवण करुन दिली. त्यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने उमेदवार देऊ नये, उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पवारांनी केले.

अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

त्यामुळे आता खरोखरच भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. शरद पवारांनी सायंकाळी अचानक भूमिका मांडल्याने राज ठाकरे यांच्या पत्रातील दम निघून गेल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पवारांना भाजपच्या भूमिकेचा अंदाज आला होता काय? असाही प्रश्न निर्माण केला जात आहे.

Exit mobile version