spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात नाना पटोलेंनी दिले स्पष्टीकरण

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. अनेक दिवस एक प्रश्न सर्वाना पाला होता.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. अनेक दिवस एक प्रश्न सर्वाना पाला होता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ठाकरे गटाला (Shivsena) पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जगदीश कुट्टी या काँग्रेस उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची २७ हजार मते मिळाली होती. यामुळं ठाकरे गटाला पाठिंबा देण्यावरुन मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर होता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला असताना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न काही नेत्यांनी उपस्थित केला होता.

अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित देशमुख , प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते. शिवसेना सचिव विनायक राऊत , विधिमंडळ गटनेते अजय चौधरी , अँड अनिल परब हे देखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

ई-पीक पाहणी, सातबाराही ऑनलाईन असताना पुन्हा ऑनलाईन नोंदणीची सक्ती कशासाठी ?; नाना पटोले

अनिल देशमुखांना मोठा दिलासा; अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss