Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Andheri By Election : पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा ‘प्लॅन B’ तयार ?

उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. महाविकासआघाडीतर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारा देण्यात आली असून, त्यांचा प्रचार देखील सुरु झालाय. मात्र, BMC जॉबमुळे ऋतुजा लटके अडचणीत आल्या आहेत. या काही गोंधळ झाल्यास पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाने प्लॅन B तयार केला आहे अशी देखील चर्चा आता होत आहे.

दरम्यान ऋतुजा लटके या तांत्रिक अडचणीतून न सुटल्यास ठाकरे गटाचा प्लॅन B तयार केला आहे. या नव्या प्लान नुसार ठाकरे गट शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरण्यास अपरात्र ठरल्यास ठाकरे गटाकडून विश्वनाथ म्हाडेश्वर, प्रमोद सावंत, कमलेश राय यांची नाव चर्चेत आहेत.

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. ऋतुजा लटके यांनी महिनाभरापूर्वी आपल्या सेवेचा राजीनामा दिला आहे. तांत्रिक अडचणींचे कारण देत मुंबई महापालिका प्रशासनाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. जोपर्यंत ऋतुजा लटके यांचा नोकरीचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरू शकत नाहीत. अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर आहे. ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात (bombay high court) धाव घेतली आहे. माझा राजीनामा तातडीनं स्वीकारावा तसेच एक महिन्याचा नोटीस कालावधी माफ करण्यात यावा अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर गुरुवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरु शकणार की नाही स्पष्ट होणार आहे.

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

हे ही वाचा :

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या मुद्दावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार; ऋतूजा लटके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

३० दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल; ऋतुजा लटके यांच्या अर्जावर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss